राज्य कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना लागू,शासन निर्णय जारी |State Employees Salary Hike

State Employees Salary Hike:महाराष्ट्र राज्य परिविक्षा व अनुरक्षण संघटना या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना २ लाभांची “सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना” लागू करणेबाबत.

महाराष्ट्र राज्य परिविक्षा व अनुरक्षण संघटना या संघटनेच्या कर्मचाऱ्यांना (एकुण पदे १७) वेतनासाठी व संघटनेच्या वेतनेत्तर

बाबीसाठी १०० टक्के अनुदान शासनाकडून देय असून त्यांना वाचा क्र.३ वरील शासन निर्णयान्वये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे.

या संघटनेवरील वर्ग तीन व चार मधील पदांना पदोन्नतीची संधी नसल्याने येथील कर्मचारी अनेक वर्षापासून एकाच पदावर

कार्यरत आहेत यास्तव त्यांच्या सेवेमध्ये कुंठितता आलेली असल्याने या कर्मचाऱ्यांना वाचा क्र. १ व २ वरील शासन

निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना १ व २ लाभांची अनुक्रमे “सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना” व “सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत

प्रगती योजना” लागू करण्यास सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशना दरम्यान दि.०७/१२/२०२३ रोजी नागपुर येथे झालेल्या मा. मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.

मा. मंत्रीमंडळाने मंजूर केलेल्या निर्णयाप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची बाब शासन विचाराधीन होती.

शासन निर्णय :-सदर शासन निर्णयान्वये वित्त विभागाचे वाचा क्र.१ व २ वरील शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेली १२ व २४ वर्षानंतरची एक व दोन लाभाची आश्वासित प्रगती योजना

महाराष्ट्र राज्य परिविक्षा व अनुरक्षण संघटनेच्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे एक लाभाची सुधारीत सेवांतर्गत योजना

दि.०१/०८/२००१ पासून व त्यानंतर पहिल्या १२ वर्षांनी दुसरा लाभ लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

Leave a Comment