MSRTC Recruitment | एसटी महामंडळात सरकारी नोकरीची संधी इतका पगार मिळेल अशाप्रकारे ऑनलाईन अर्जाविषयी सविस्तर जाणून घ्या

MSRTC Recruitment | एसटी महामंडळात सरकारी नोकरीची संधी इतका पगार मिळेल अशाप्रकारे ऑनलाईन अर्जाविषयी सविस्तर जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भरती करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागात भरती करण्यात येणार आहे. याठिकाणी तरुण अर्ज करू शकतात.

साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, यवतमाळ येथे लिपिक, सहाय्यक, शिपाई, इलेक्ट्रिशियन पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

दरम्यान या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यवतमाळ एसटी महामंडळात 68 पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

या पदांसाठीच्या पत्रतेबद्दल बोलायचे झाल्यास नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी पास किंवा आयटीआय किंवा डिप्लोमा घेतलेला असणे अवश्यक आहे. 18 ते 35 वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज कुठे करणार?

उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/ index या संकेसस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल.

या नोकरीसाठी उमेदवारांना 6000 ते 10000 रुपये पगार मिळणार आहे.

सध्या मुख्यमंत्री ग्रामदूतसाठीदेखील भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर आहे. या भरतीअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत भरती केली जाणार आहे. 50000 रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Leave a Comment