State Employee Age Retirement GR:नियोजन विभागाच्या अधिनस्त असलेल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवर कार्यरत गट-अ व गट-ब (राजपत्रित) अधिकाऱ्यांची त्यांच्या वयाच्या ५०/५५ व्या
वर्षापलिकडे अथवा ज्यांची अर्हताकारी सेवेची ३० वर्षे पूर्ण झाली आहेत अशा अधिकाऱ्यांची शासन सेवेत राहण्याची पात्रापात्रता आजमाविण्यासाठी पुनर्विलोकन समिती गठित करणेबाबत.
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ च्या नियम १०(४) व नियम ६५ अनुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम, संशयास्पद सचोटीच्या गट-अ व गट-ब (राजपत्रित) अधिकारी यांचे त्यांच्या वयाच्या ५०/५५ व्या वर्षापलीकडे / अर्हताकारी
सेवेच्या ३० वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयाद्वारे एकत्रित कार्यपध्दती विहित केलेली आहे.
त्यानुसार संदर्भाधीन क्रमांक २ येथील शासन निर्णयानुसार नियोजन विभागाच्या अधिनस्त असलेल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट-अ व गट-ब (राजपत्रित) अधिका-यांची त्यांच्या वयाच्या ५०/५५ व्या वर्षापलीकडे अथवा