राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय जारी|State Employee Payment Allowance

State Employee Payment Allowance:जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते भागविण्याकरीता सन २०२३-२४ करीता अनुदान वितरीत करण्याबाबत.

मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक ३१.०३.२०२२ च्या बैठकीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा- प्रशासन योजना बंद करण्याऐवजी राज्य शासनाकडून १००% राज्य योजना म्हणून पुढील ५ वर्षे म्हणजेच दिनांक ०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२७ पर्यंत पूर्वीप्रमाणे सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-प्रशासन योजनेकरीता दिनांक ०१ एप्रिल, २०२२ पासून १५ पदांऐवजी ८ पदे निश्चित करण्यात आले असून उर्वरित पदावरील अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा त्यांच्या मूळ आस्थापनेवर प्रत्यार्पित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

वित्तीय वर्ष २०२३-२४ करीता मागणी क्र. एल-३. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन, लेखाशिर्ष-२५१५ २६०१ (१००% राज्य हिस्सा) अंतर्गत रुपये २८,४२,०६,०००/- (अठ्ठावीस कोटी बेचाळीस लक्ष सहा हजार फक्त) इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली आहे.

शासन निर्णय क्र. जिग्राप्र-११२३/प्र.क्र.१७/योजना-५ दि. २८ जून, २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे रु. ५,६८,४१,२००/- (रु. पाच कोटी अडुसष्ठ लक्ष एकेचाळीस हजार दोनशे फक्त) इतका निधी

तसेच शासन निर्णय क्र. जिग्राप्र-११२३/प्र.क्र.३३/योजना-५ दि. ११ ऑक्टोबर, २०२३ अन्वये रु. ६.२५,००,०००/- (रु. सहा कोटी पंचवीस लक्ष फक्त) असा एकूण ११,९३,४१,२००/- (रु. अकरा कोटी त्र्यान्नव लक्ष एक्केचाळीस हजार दोनशे फक्त) इतका निधी

आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन मधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरीता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून वितरीत करण्यात आला आहे.

सन २०२३-२४ करीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरीता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आहरण व वितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (बी.डी.एस.) निधी उपलब्ध करुन देण्याची बाब विचाराधीन होती.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरीता आवश्यक प्रतिमाह वेतनासाठी सरासरी खर्च व त्यांच्याकडील शिल्लक निधी विचारात घेऊन सन २०२३-२४ करीता जिल्हा ग्रामीण विकास

यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरीता रु. ९,५४,००,०००/- (रु. नऊ कोटी चोपन्न लक्ष फक्त) इतका निधी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (बी. डी.एस.) खालील विवरणपत्रानुसार वितरीत करण्यात येत आहे.

➡️➡️शासन निर्णय येथे डाऊनलोड करा⬅️⬅️

 

Leave a Comment