राज्य शासन सेवतील 40 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक असणाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी | State Employees GR

State Employees GR:अ.भा.से. (कार्य मुल्यांकन अहवाल) नियम, २००७ प्रमाणे सन २०२३-२४ मध्ये भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांनी करुन घ्यावयाच्या वैद्यकीय तपासणीबाबत.

अखिल भारतीय सेवा (कार्यमुल्यांकन अहवाल) नियम, २००७ हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी, सन २००७-०८ या वर्षापासून लागू करण्यात आलेले आहेत.

या नियमांप्रमाणे ४० वर्षे किंवा अधिक वय असलेल्या भा.प्र.से. अधिकाऱ्यांनी वरील नियमानुसार विहित केलेल्या वैद्यकीय तपासण्या प्रतिवर्षी करुन घेणे बंधनकारक असून त्यांच्या

वैद्यकीय तपासणीच्या अहवालाचा सारांश, वार्षिक कार्यमूल्यांकन अहवालासोबत जोडणे आवश्यक आहे. सन २०२३-२४ या वर्षी राज्यातील ४० वर्षे किंवा अधिक वय असलेल्या भाप्रसे

अधिकाऱ्यांची अखिल भारतीय सेवा (कार्यमुल्यांकन अहवाल) नियम, २००७ नुसार विहित केलेली वैद्यकीय तपासणी करण्यासंदर्भात शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय अखिल भारतीय सेवा (कार्यमुल्यांकन अहवाल) नियम, २००७ मधील नियम ३ व त्यासोबतचा नमुना ४ अनुसार, दिनांक ३१.३.२०२३ रोजी ४० वर्षे किंवा अधिक वय असलेल्या

राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांनी, त्यांची विहित वैद्यकीय तपासणी चालू वर्षी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र-अ मध्ये नमूद केल्यानुसार महसूल विभागनिहाय

निश्चित केलेल्या खाजगी रुग्णालयातून किंवा शासकीय किंवा महानगरपालिका रुग्णालयातून करुन घ्यावी.सदर वैद्यकीय तपासणी करताना खालील सुचनांनुसार कार्यवाही करण्यात यावी.

➡️शासन निर्णय येथे डाऊनलोड करा ⬅️

Leave a Comment