कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती व सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जारी |State Employees New GR

State Employees New GR :तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अशासकीय अनुदानित पदवी व पदवीका संस्थेतील तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठ, लोणेरे येथील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती व सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाम मंजूर करण्याबाबत..

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक १ व २ च्या शासन निर्णयान्वये तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत अशासकीय अनुदानित पदवी / पदविका संस्थेतील कार्यरत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली आहे.

तवनंतर सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि. १.४.२०१० व दि. ५.७.२०१० च्या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषद ग्रामधील पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असलेल्या व एकाकी पदावरील कर्मचाऱ्यांसाठी कार्यान्वित असलेली “सेवाअंतर्गत आश्वासित

प्रगती योजना सुधारित करून सदरची योजना “सुधारित सेवाअंतर्गत आशसित प्रगती योजना’ या नावाने लागू केलेली आहे.वित्त विभागाच्या वरील उल्लेखित शासन निर्णयांस अनुसरून उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संदर्भाधीन दिनांक २८.१२.२०१० व दिनांक १५.२.२०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये तरोच

तदनंतरच्या दिनांक ३१.५.२०२३ रोजीच्या आदेशान्वये अकृषि विद्यापीठे व संलग्नित अनुदानित महाविद्यालयांमधील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना” लागू करण्यात आली आहे. मात्र सदर शासन

निर्णयात तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत अशासकीय अनुदानित पदवी व पदविका संस्थेतील तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश नव्हता, त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून सहाव्या वेतन

आयोगाच्या अनुषंगाने वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक १.४.२०१० आदेशानुसार लागू करण्यात आलेली सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना” लागू करण्याबाबत शासनास वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता.

याअनुषंगाने संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांनी त्यांच्या संदर्भाधीन दिनांक

१२.२.२०२० व दिनांक १०.७.२०२३ रोजीच्या पत्रान्वये तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत असलेल्या अशासकीय अनुदानित पदवी व पदविका संस्थेतील कार्यरत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने * सुधारित सेवाअंतर्गत

आश्वासित प्रगती योजना” लागू करण्याच्या अनुषंगाने सदर योजनेतील कर्मचाऱ्यांची संख्या व योजनेचा लाभ अनुज्ञेय केल्यास शासनावर येणाऱ्या अतिरिक्त आर्थिक भारासह स्वर्यस्पष्ठ प्रस्ताव शासनास सादर केला आहे.

यानुसार सदर प्रकरणी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अशासकीय अनुदानित पदवी व पदविका संस्थेतील तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय

कर्मचार्याप्रमाणे सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पुर्वलक्षी प्रभावाने सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यासंदर्भात पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

  👉शासन निर्णय डाऊनलोड करा👈

 

Leave a Comment